एकदरा पुलाच्या अरुंद वळणामुळे वाहतुकीला अडथळा

| मुरूड | वार्ताहर |

मुरूड एकदरा खाडी पुलावर काळभैरव मंदिराजवळ असलेल्या वळणावर येणार्‍या शैक्षणिक सहलीच्या व पर्यटकांच्या बसेस अपुर्‍या वळणदार रस्त्यामुळे वाहतूकीला अडथळा निर्माण होत आहे. या वळणावर मध्यभागी असलेला पथदिव्याच्या खांबामुळे बसेसला वळवताना अडथळा निर्माण होत आहे. हा वळणदार रस्ता मोठा करण्यासाठी पथदिवे असलेला खांब हटवून वाहतूक सुरळीत करावी, अशी मागणी सर्वस्तरातून होत आहे.

या वर्षात मुरुड तालुक्यातील शैक्षणिक सहलीच्या बसेसने रेकॉड ब्रेक केला आहे. दिवसा मागे शेकडो बसेस जंजिरा किल्ला पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात येत आहेत. तसेच मोठ्या प्रमाणात पर्यटक आपापल्या खाजगी वाहनाने येत आहेत. परंतु इतक्या वर्षांनी मोकळीक मिळाली असल्याने पर्यटकांच्या संख्येत मोठी वाढ झाली असल्याचे दिसून येत आहे. याचा परिणाम वाहतूकीवर मोठ्या प्रमाणात होत आहे.

मुरूड शहरातून जंजिरा किल्ल्यावर जाण्यासाठी असलेल्या अरुंद रस्त्यामुळे पर्यटकांना वाहतूकीच्या अडथळ्यांना तोंड द्यावे लागत आहे. याचा फटका मुरूड समुद्रकिनार्‍यावरुन येणार्‍या पर्यटकांच्या मोठमोठ्या बसेसना बसत आहे. मुरूड एकदरा पुलावर जाण्यासाठी असलेल्या अरुंद वळणामुळे बसेस एकदा प्रयत्नाने वळत नसल्याने अनेकदा मागेपुढे करुन वळवावी लागत असल्याने वाहतूकीवर अडथळा निर्माण मोठ्या प्रमाणात वाहतूक जाम होत आहे. तरी या वळणावर असलेला पथदिव्याचे खांब हटवून वळणदार मार्ग मोठा करावा व होणार्‍या वाहतूकीला अडथळा दूर करावा, अशी मागणी पर्यटक, स्थानिक नागरिकांनी व वाहन चालकांनी केली आहे.

Exit mobile version