साळाव पुलावरून वाहतूक सुरळीत

| रेवदंडा | वार्ताहर |

साळाव पुलाच्या दुरूस्तीचे काम गेले सहा महिने सुरू होते. सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अखत्यारीत सुरू असलेले साळाव पुलाचे काम नुकतेच आटोक्यात आले असून, पुलावरून वाहतुक सुरळीत सुरू झाली आहे.

मुरूड-रोहा-अलिबाग तालुक्यांना जोडणारा व मध्यवर्ती असलेला साळाव-रेवदंडा पुलाचे दुरूस्ती काम गेले दोन वर्षे सुरू आहे. गेल्या नोव्हेंबर महिन्यात पुनश्‍च सार्वजनिक बांधकाम खात्याने पुलाचे दुरूस्ती काम सुरू केले. यावेळी साळाव पुलावरून अवजड वाहने ने-आण करण्यास बंदी ठेवण्यात आली होती. साळाव पुलाचे काम सुरू असताना पुलावरून एकेरी मार्ग वाहतुकीसाठी खुला होता. मात्र, मुरूड पर्यटन क्षेत्र असल्याने साळाव पुलावरून वाहनांची मोठी रेलचेल सुरू होती. त्यामुळे साळाव पुलावरील एकेरी मार्ग अडथळ्यामुळे नित्याने वाहतूक कोंडी होत होती. साळाव पुलाचे काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण करावे, अशी मागणी सर्व स्तरातून केली जात होती.

Exit mobile version