जेएनपीए परिसरात वाहतूक कोंडी

| उरण | वार्ताहर |

जेएनपीए बंदर आणि त्यावर आधारित आयात-निर्यात आणि मालाची साठवणूक करण्यासाठी आलेल्या कंटेनर, ट्रेलर आणि टँकरचालकांनी आपली वाहने रस्त्यावरच उभी केल्याने वाहतुकीला अडथळा होऊन वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत आहे.

जेएनपीए परिसरात त्यांच्या आधारावर मालाची साठवणूक करण्यासाठी कंपन्या निर्माण झाल्या आहेत. तसेच, दिवसाकाठी हजारो कंटेनर आयात-निर्यातीसाठी येत आहेत. या ट्रेलरमुळे होत असलेली वाहतूक कोंडीची समस्या दूर करण्यासाठी जेएनपीएने रस्त्यांसाठी करोडो रुपये खर्च केले आहेत. तसेच, जेएनपीएने यावर आणखी उपाय म्हणून कोट्यवधी रुपये खर्च करून अद्ययावत अधिकृत पार्किंग झोन बनविले आहेत. मात्र, ट्रेलरचालक तेथे आपली वाहने उभी न करता बेकायदा पार्किंग करत आहेत. तसेच, जागा मिळेल तिथे रस्त्यावर वाहने उभी करत आहेत. त्यामुळे इतर वाहनांना अडथळा निर्माण होत असून वाहतूक कोंडीची ही समस्या निर्माण झाली आहे. याकडे जेएनपीए प्रशासनाचे अधिकारी दुर्लक्ष करीत असल्याचे दिसत आहे. जेएनपीए परिसरातील ही समस्या दूर करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देण्याची मागणी करण्यात येत आहे.

Exit mobile version