| उरण | वार्ताहर |
खोपटा-कोप्रोली रस्त्यावर दरदिवशी सायंकाळच्या सुमारास प्रचंड वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत आहे. त्यामुळे वाहतूक कोंडीतून मार्गक्रमण करणार्या रुग्णांना, विद्यार्थी, नोकरदार, महिलांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
जेएनपीए बंदर, उरण, नवी मुंबई, मुंबई व पेण, अलिबाग शहराला जोडणारा खोपटा- कोप्रोली हा महत्त्वाचा रस्ता आहे. या रस्त्याच्या आजूबाजूला देश-परदेशात आयात-निर्यात करणार्या मालाची हाताळणी करणार्या गोदामांची उभारणी करण्यात आली आहे. त्यामुळे वाहतुकीच्यादृष्टीने महत्त्वाच्या समजल्या जाणार्या खोपटा रस्त्यावरुन दररोज प्रवासी वाहनांची व अवजड वाहनांची रेलचेल ही अनेक पटींनी वाढली आहे. सायंकाळच्या सुमारास सदर रस्त्यावर अवजड वाहने ही आडवी उभी गोदामात ये-जा करण्यासाठी वळविली जात असल्याने अशा अवजड वाहनांच्या रहदारीमुळे दरदिवशी सायंकाळच्या सुमारास प्रचंड वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत आहे.
अशा आडव्या उभ्या अवजड वाहनांच्या रहदारीमुळे दरदिवशी सायंकाळच्या सुमारास खोपटा-कोप्रोली रस्त्यावर प्रचंड वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत आहे. त्यामुळे त्याचा त्रास हा रुग्णांना, विद्यार्थी, नोकरदार, चाकरमानी व महिलांना नाहक सहन करावा लागत आहे. तरी सायंकाळी ठिक 5.30 ते 6.30 या एका तासाच्या कालावधीत सदर रस्त्यावर अवजड वाहनांना बंदी घालण्यात यावी, अशी मागणी नोकरदार, विद्यार्थी, महिला वर्ग करत आहेत.