। माणगाव। वार्ताहर ।
मुंबई-गोवा महामार्गावर सुमारे 5 किलोमीटर अंतरावर वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. माणगाव बाजारपेठ ते तिलोरे फाट्या पर्यंत वाहतूक संथ गतीनं सुरु आहे. पावसामुळं देखील वाहतुकीवर परिणाम होत आहे. सलग सुट्ट्यांमुळे प्रवाशांची संख्या वाढली आहे. पोलीस वाहतूक नियमनासाठी तातडीने उपाययोजना करत आहेत.
मुंबई-गोवा महामार्गावर आज कोकणात जाणाऱ्या मार्गावर जोरदार वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. माणगाव बाजारपेठ पासून तिलोरे फाट्या पर्यंत सुमारे5 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. सलग आलेल्या सुट्ट्यांमुळे प्रवाशांची संख्या वाढल्याने महामार्गावरील वाहने धीम्या गतीने चालत आहेत. स्थानिक पोलिसांनी वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न सुरू केले असून, वाहनचालकांनी संयम राखून मार्गक्रमण करण्याचे आवाहन केले आहे. वाहतूक कोंडीमुळे प्रवाशांना वेळेत पोहोचण्यात अडचणी येत आहेत. पोलिसांनी मार्गावर वाहने नियमन करण्यासाठी तातडीने उपाययोजना केली आहे.







