मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी

सलग सुट्ट्यांसह काँक्रिटीकरणाच्या कामाचा परिणाम

| पनवेल | वार्ताहर |

शनिवार, रविवार आणि सोमवार, महाराष्ट्र दिन अशा सलग सुट्ट्यामुळे मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर आज सकाळपासून वाहतूक कोंडी दिसून आली. त्याच प्रमाणे सध्या मुंबई-गोवा महामार्गावर चालू असलेल्या काँक्रेटीकरणाच्या कामामुळे त्यात आणखी भर पडली.

आज सकाळपासूनच मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी झाल्याचे दिसून येत आहे. शनिवार, रविवार आणि सोमवार अशा सलग तीन सुट्ट्या आल्याने मुंबई, उपनगरे, नवी मुंबई, ठाणे परिसरातील नागरिक मोठ्या प्रमाणात विकएन्डसाठी मुंबई बाहेर जात आहेत. मुंबई आणि परिसरात गेल्या काही दिवसात उन्हाचे चटके बसत असून, घामाच्या धारा वाहत आहेत, तर मुंबईव्यतिरिक्त अलिबाग, मुरुड, तसेच कोकणात समुद्रामुळे वातावरण थंड असल्याने उन्हाळ्यात गारवा अनुभवण्यासाठी कुटुंबासह लोक बाहेर पडल्याने मुंबई गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी होत झाली. सलग आलेल्या सुट्ट्या आणि मुंबई गोवा महामार्गावर सुरु असलेले काँक्रेटीकरण यामुळे वाहतूक कोंडीत अधिक भर पडली. या अनुषंगाने वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी ठिकठिकाणी वाहतूक पोलीस तैनात करण्यात आले आहेत.

Exit mobile version