परतीच्या प्रवासात वाहतूक कोंडी

| मुरुड जंजिरा | वार्ताहर |

सलग सुट्टयांचा आनंद लुटण्यासाठी रायगडात आलेल्या पर्यटकांना परतीच्या प्रवासात वाहतूक कोंडीशी सामना करावा लागत असल्याचे प्रकर्षाने जाणवत आहे.

मुरुड हे मुंबई, पुणे यांना सर्वात जवळचे पर्यटन स्थळ असल्याने व स्वच्छ सुंदर विशाल समुद्र किनारा, समुद्रात उभे असलेला 2 जलदुर्ग जंजिरा, पदामदुर्ग, दत्त मंदिर, इदगाह, गारंबी आणि खोकरी अशी पर्यटन स्थळामुळे मुरुड पर्यटकांच्या पसंतीला आले आहे. शनिवार रविवारची सुटी आल्याने मुरुड हाऊस फुल्ल झालेले आहे. जारो वाहन मुरुड शहरात आल्यावर त्यांच्या पार्कींगचा प्रश्‍न मोठा जटील झाला आहे. त्यासाठी पोलिसांना पूर्व नियोजन करावे लागणार आहे.

सलग सुटीनंतर परतीच्या प्रवासात मुरुड शहर, नांदगाव, काशीद, रेवदंडा येथे व वडखळ येथे वाहतूक कोंडी होते. पर्यटकांना घरी जाण्याची घाई असल्याने वाहतुकीचे नियम पाळलेे जात नाही. येण्याच्या रस्त्यावर गाडया घालतात आणि वाहतूक जाम होते. दरवर्षी समिती वाहतुकीचे नियोजन पोलीस आणि नगरपालिका अधिकारी एकत्र बसून करतात रीदेखील पर्यटकांच्या वाहनांना जागा अपुरी पडत आहे. समुद्रालगत असणारा रस्ता हे पर्यटकांचे प्रमुख आकर्षण असल्याने प्रत्येक पर्यटक आपले वाहन त्या रस्त्यावरुन नेत असतो. त्यामुळे त्यामुळे वाहतूक कोंडीला सामोरे जाव लागत आहे.

Exit mobile version