। पनवेल । प्रतिनिधी ।
जागतिक दिव्यांग दिनाचे औचित्य साधून नवीन पनवेल विभागामध्ये रोटरी क्लब आयोजित दिव्यांग जनजागृती रॅली आयोजित करण्यात आली होती. त्यानिमित्ताने आयोजित या रॅलीत सहभागी मुला-मुलींना प्रोत्साहन म्हणून पनवेल शहर वाहतूक शाखेतील वरिष्ठ पोलीस निरीक्षक औदुंबर पाटील यांच्या सहकार्याने पोलीस उपनिरीक्षक शेरखाने, पोहवा येळे, पोलीस हवालदार चौधरी, पोहवा मुलाणी, पोलीस हवालदार पाटील, पोलीस शिपाई थिटे यांच्याकडून आदई सर्कल नवीन पनवेल या ठिकाणी आल्यानंतर दिव्यांग मुलांसाठी कॅडबरी व पाण्याच्या बाटल्या वाटप करण्यात आल्या. या उपक्रमामुळे दिव्यांग मुलांमध्ये उत्साह आपुलकीची भावना निर्माण झाली असून हा उपक्रम अत्यंत कौतुकास्पद आहे. वाहतूक पोलिसांच्या या कार्याचे नागरिकांकडून कौतुक करण्यात येत आहे.







