| चिरनेर | प्रतिनिधी |
पोलीस रेझिंग डे सप्ताह तसेच रस्ता सुरक्षा अभियान 2026 निमित्त न्हावा-शेवा वाहतूक शाखा चांदणी चौक येथे वाहन चालक-मालक तसेच चौकमध्ये वावरणाऱ्या लोकांना एकत्रित करून वाहतूक नियमाविषयी जनजागृती केली. नवी मुंबई वाहतूक पोलिस उपायुक्त तिरुपती काकडे यांचे मार्गदर्शनाखाली न्हावा शेवा वाहतूक शाखेच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक वैशाली गलांडे, अंमलदार प्रभाकर सुलेभाविकर, किरण म्हात्रे यांनी वाहतूक नियमाविषयी जनजागृती करून, रेझींग डेचे बोर्ड दाखवून, तसेच रस्ता सुरक्षा अभियान अंतर्गत वाहनचालकांना वाहतूक नियमाबाबत मार्गदर्शन केले. गाडी विरुद्ध दिशेने न चालविणे, दारू पिऊन गाडी न चालवणे, नेहमी लायसन्स जवळ बाळगणे, रिक्षा चालकांनी नेहमी युनिफॉर्म परिधान करणे, गाडी चालवीत असतांना मोबाईलवर संभाषण न करणे, मोटरसायकल चालवताना हेल्मेट परिधान करणे अशाप्रकारचा सूचना दिल्या. या कार्यक्रमाच्या अनुषंगाने त्यांच्यादेखील काही समस्या ऐकून त्यांना योग्य ते मार्गदर्शन यावेळी करण्यात आले.







