| सुतारवाडी | वार्ताहर |
सुतारवाडी पासून अगदी हाकेच्या अंतरावर छोटा पूल आहे. या पुलाचे कठडे तोडून ट्रेलर खालती कोसळला असून, चालक जखमी झाला आहे. अधिक उपचारासाठी त्याला प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, विलेभागाड येथे कॉईल देऊन ट्रेलर परतीच्या मार्गावर होता सुतारवाडी जवळील छोट्या पुला नजीक आल्यानंतर चालकाचा ताबा सुटून ट्रेलर खाली आला. विले भागाड येथील कंपन्यांमध्ये कच्चामाल दिला की परतीच्या प्रवासात ट्रेलर चालक सुसाट वेगाने येत असतात. या परिसरात त्यांनी अनेक अपघातही केलेले आहेत. हेटवणे येथील दोन व्यक्तींना या अगोदर उडवले होते. त्यांचा जागीच मृत्यू झाला होता. या वाहन चालकांचा वेगळा नियंत्रण नसतो. कधी कधी तर त्यांच्या कानाला कोडही असतो. या परिसरातील रस्ता नागमोडी असून, वेगावर नियंत्रण असणे आवश्यक आहे. ज्या ठिकाणी ट्रेलर पलटी झाला त्या ठिकाणी गणपती विसर्जन केले जाते.







