| पनवेल | प्रतिनिधी |
जिल्हाधकिारी व रायगड जिल्हा निवडणूक अधकिारी किसन जावळे यांच्या आदेशानुसार मावळ लोकसभा मतदारसंघाच्या पनवेल विधानसभा मतदारसंघामधील 2 हजार 795 मतदान अधिकारी व कर्मचार्यांसाठी (दि.12) व (दि.13) एप्रिल रोजी चार सत्रात पनवेल शेंडुंग येथील छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठात ऑडिओ व्हिजुअल प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते.
(दि.12) एप्रिल रोजी दोन सत्रात 1 हजार 400 अधिकारी व कर्मचारी यांना मावळ लोकसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी दीपक सिंगला यांच्या उपस्थितीत निवडणूक निर्णय अधिकारी राहुल मुंडके यांच्या मार्गदर्शनाखाली अधिकारी, कर्मचारी यांना निवडणूक कर्तव्याबाबत व ईव्हीएम मशीनबाबत तांत्रिक प्रशिक्षण देण्यात आले. या वेळी प्रशिक्षणाच्या ठिकाणी मतदान अधिकारी, कर्मचारी यांची गैरसोय होऊ नये म्हणून जागोजागी दिशादर्शक फलक, हजेरी नियोजन फलक लावण्यात आले होते. तसेच वैद्यकीय पथकाचीदेखील प्रशिक्षणाच्या ठिकाणी सोय करण्यात आली होती. येणार्या प्रशिक्षणार्थींच्या पार्किंगसाठी व्यवस्था करण्यात आली होती. प्रशिक्षण ठिकाणी मतदान अधिकारी, कर्मचारी यांना गरमीचा त्रास होवू नये, म्हणून कुलर व फॅनची व्यवस्था चांगल्या प्रकारे करण्यात आलेली होती. तसेच प्रशिक्षणासाठी आलेल्या सर्व प्रशिक्षणार्थींना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात येऊन चहा, पाणी व नाश्ताची उत्तम सोय करण्यात आली होती. यावेळी सहायक निवडणूक निर्णय अधिकारी राहुल मुंडके यांनी साध्या व सोप्या भाषेमध्ये निवडणूक कर्तव्याबाबत प्रशिक्षण दिले. तसेच ईव्हीएम मशीन हाताळणी कशी करावी, याबाबत सर्व निवडणूक क्षेत्रिय अधिकारी व मास्टर ट्रेनर्स यांनी काम पाहिले.







