लोकसभा निवडणूक कर्मचार्‍यांचे प्रशिक्षण

। म्हसळा । वार्ताहर ।

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक अंतर्गत येत्या 7 मे रोजी होणार्‍या मतदाननिमित्त श्रीवर्धन मतदार केंद्रस्तरीय अधिकारी आणि कर्मचारी यांचे पहिले प्रशिक्षण माणगाव येथे सोमवारी (दि.8) संपन्न झाले. तसेच, ईव्हीएम व्हीव्हीपॅट यंत्र हाताळणेबाबत प्रशिक्षण अशोक दादा साबळे विद्यालयामध्ये संपन्न झाले.

यावेळी अप्पर जिल्हाधिकारी ज्योत्स्ना पडियार यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झालेल्या या प्रशिक्षणासाठीसाठी उपविभागीय अधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी श्रीवर्धन महेश पाटील, श्रीवर्धन तहसीलदार महेंद्र वाकलेकर, म्हसळा तहसीलदार समीर घारे, माणगाव तहसीलदार विकास गारुडकर, तळा तहसीलदार स्वाती पाटील आदि अधिकारी उपस्थित होते.

सर्व कर्मचारी यांना आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये कर्तव्य पार पाडण्यासाठी आवश्यक प्रशिक्षण माणगाव तहसीलदार विकास गारुडकर यांनी दिले. निवडणुकीच्या काळात प्रत्येक अधिकारी आणि कर्मचारी यांची महत्वाची भूमिका असते, असे म्हसळा तहसीलदार समीर घारे यांनी सांगून प्रत्येक कर्मचार्‍याने भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या सुचनांचे काटेकोर पालन अत्यावश्यक असल्याचे सांगितले.

Exit mobile version