| मुरुड-जंजिरा | प्रतिनिधी |
मुरूड-जंजिरा नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 करिता 2 डिसेंबरला निवडणूक व 3 डिसेंबर मतमोजणी होणार आहे. त्या अनुषंगाने गुरूवारी (दि.20) मुरूड नगरपरिषद कार्यालयातील सभागृहात सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा मुख्याधिकारी सचिन बच्छाव यांच्या मार्गदर्शनाखाली मतदान केंद्राध्यक्ष व इतर मतदान अधिकारी यांचे पहिले सविस्तर प्रशिक्षण यशस्वीरित्या संपन्न झाले.
यावेळी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तथा मुख्याधिकारी सचिन बच्छाव यांनी सर्व मतदान कर्मचाऱ्यांना त्यांच्या कायदेशीर जबाबदाऱ्या आणि कर्तव्यांची जाणीव करून दिली. तसेच प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी कोणतीही अडचण येऊ नये म्हणून एल सीडी प्रोजेक्टरच्या माध्यमातून व्हिडिओ दाखवुन आणि ईव्हीएम मशीन हाताळणी चे प्रशिक्षण प्रक्रिया अत्यंत अचुकपणे पार पाडण्यासाठी प्रशिक्षित केले जात आहे. तसेच ईव्हिएम सीलींग व हाताळणी मतदान यंत्रे सील करण्याची तांत्रिक पध्दत आणि त्यावेळेस घ्यावयाची दक्षता या बाबत अधिकाऱ्यांना निवडणूक प्रक्रियेबाबत सखोल मार्गदर्शन केले. यावेळी नायब तहसीलदार राजेश्री साळवी, क्षेत्रीय अधिकारी अमित सांगळे, संतोष कचरे, मंडळ अधिकारी मंगेश इंगुळकर, नगरपरिषद प्रशासकीय अधिकारी नंदकुमार आंबेतकर, कर निरीक्षक अनिकेत जगदाळे, बांधकाम इंजिनिअर अनिकेत वाजे, अधिराज चौलकर, पल्लवी डोंगरीकर, संजय बामुगडे, जयेश चोडणेकर आदिंसह क्षेत्रिय अधिकारी,शिक्षक वर्ग व ग्रामपंचायत कर्मचारी, नगरपरिषद कर्मचारी उपस्थित होते.







