अलिबागेत रविवारी आर्थिक नियोजनाविषयी प्रशिक्षण

। अलिबाग । वार्ताहर ।
आतापासून योग्य गुंतवणूक केली तर आपला भविष्यकाळ चांगला जाईल, असे बोलले जाते. परंतु ती गुंतवणूक कुठे आणि कशी करावी, यासाठी अलिबाग येथे आर्थिक नियोजनाविषयी प्रशिक्षण रविवार, 26 फेब्रुवारी रोजी सायं. सहा वाजता आयोजित करण्यात आले आहे. आर्थिक नियोजनकार समीर दिघे याबाबत मार्गदर्शन करणार आहेत. वेव्हज् हॉटेल, अ‍ॅक्सिस बँकेसमोर, कर्वे रोड, अलिबाग येथे हे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.

आर्थिक नियोजन करूनच आर्थिक प्रश्‍न सोडवता येतात. त्यामुळे रोजच्या जगण्यातील मनावरील ताण कमी होतो आणि आपली कार्यक्षमता वाढते. ह्यासाठीच आर्थिक नियोजनाचे पुढचे पाऊल हा मोफत कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. समीर यांनी आतापर्यंत महाराष्ट्र पोलिसांसाठी 400 हून अधिक आर्थिक नियोजन या विषयावर कार्यक्रम घेतलेले आहेत. या प्रशिक्षणात बजेट लक्षात घेऊन गुंतवणूक धोरण कसे आखायला हवे? महिन्याच्या शेवटी पैसे उरतच नाही वाचवायचे कसे?, उत्पन्न खर्च आणि गुंतवणूक याचे नियोजन कसे करायला हवे?, एफ.डी.मध्ये गुंतवणूक होताना व्याजदर कमी होत आहे, वाढती महागाई पैशांची विकत घेण्याची क्षमता कमी करत आहे, आपले आर्थिक नियोजन का करावे कसे करावे? याविषयी मार्गदर्शन करण्यात येणार आहे. कार्यक्रमानंतर याच ठिकाणी भोजनाची व्यवस्था करण्यात आली आहे. अधिक माहितीसाठी 8149662629 या क्रमांकाशी संपर्क साधावा.

Exit mobile version