शिक्षकांना डिजिटल साक्षरबाबत प्रशिक्षण

| खांब | वार्ताहर |

जि.प. रायगड व पंचायत समिती रोहा यांच्या विद्यमाने प्रथम इन्फोटेक फाऊंडेशन यांच्या माध्यमातून रोहा तालुक्यातील 34 शाळांमधील 40 शिक्षकांना डिजिटल साक्षरबाबतीत प्रशिक्षण देण्याचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न करण्यात आला. बदलत्या शैक्षणिक गरजा भागविण्यासाठी व गुणवत्ता पूर्ण शिक्षण देण्यासाठी अध्ययन अध्यापन प्रक्रियेत तंत्रज्ञानाचा वापर केल्यास विद्यार्थ्यांना व शिक्षकांना आधुनिक पद्धतीने शैक्षणिक प्रगतीचा स्तर उंचावण्यास मदत होण्यासाठी प्रथम इन्फोटेक फाऊंडेशन यांच्यामार्फत कोएसो मेहेंदळे हायस्कूल येथे प्रशिक्षण देण्यात आले. या प्रशिक्षणामध्ये हायब्रीड अध्ययन पद्धतीचा वापर करून विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती वाढविण्यासाठी कशाप्रकारे मदत होईल, याबाबत जिल्हा समन्वयक राकेश डिंगणकर, प्रशिक्षक नंदिनी देवकर आणि पेण तालुका समन्वयक भाग्यश्री भोईर यांनी मार्गदर्शन केले. याप्रसंगी गटशिक्षणाधिकारी मेघना धाईगुडे उपस्थित होत्या. तसेच तालुक्यातील मागील वर्षी शैक्षणिक साहित्य पुरविलेल्या शाळा व डिजिटल डिव्हाईसचे साहित्य उपलब्ध असणाऱ्या शाळांचा विशेष सहभाग होता.

Exit mobile version