| अलिबाग | प्रतिनिधी |
एप्रिल महिना संपल्यावर अनेकांना बदल्याचे वेध लागतात. रायगड जिल्हा परिषदेतील 56 कर्मचाऱ्यांची बदली नुकतीच प्रशासनाकडून करण्यात आली आहे. जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात समुपदेशनानुसार बदली केली असल्याची माहिती उपमुख्य कार्यकारी अधिकारी निलेश घुले यांनी दिली.
दहा वर्ष सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांची प्रशासकिय बदली व तीन वर्षे सेवा केलेल्या कर्मचाऱ्यांची विनंती बदली केली आहे. त्यामध्ये कनिष्ठ सहाय्यक, आरोग्य कर्मचारी, ग्रामसेवक, विस्तार अधिकारी अशा वेगवेगळ्या कर्मचाऱ्यांची कृषी, आरोग्य आदी विभागातून बदली करण्यात आली आहे. या कर्मचाऱ्यांचे नुकतेच जिल्हा परिषदेमध्ये समुपदेश केले. त्यानंतर त्यांची बदली प्रक्रीया पार पाडली, असल्याचे घुले यांनी सांगितले.







