| उरण | प्रतिनिधी |
उरण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी उरण पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकपदी संदीपन शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
तालुक्यातील पिरकोन गावातील सतीश गावंडसह दोघांना दामदुपट योजनेअंतर्गत व्यवसाय करून फसवणूक केल्याच्या नंतर संशयितांना अटक करण्यात आली होती. त्यांच्याकडून 10 कोटीच्या आसपास रोकड जप्त करण्यात आली होती. याची तक्रार उरण पोलीस ठाण्यात दि. 18 फेब्रुवारी रोजी एका महिलेने दाखल केली होती. त्यानंतर पोलिसांनी कारवाई करीत दोघांना अटक केली होती.
या घटनेचा तपास करीत असताना या सर्व प्रकरणाची माहिती उरण पोलिसांना असल्याचा होता. असा ठपका ठेवत वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांच्यावर ठेवत त्यांची उरण पोलीस ठाण्यातुन तडकाफडकी बदली करून त्यांची रवानगी नवी मुबंई पोलीस दलाच्या नियंत्रण कक्षात करण्यात आली आहे. सुनील पाटील यांच्या जागी संदीपन शिंदे यांची सध्या नियुक्ती करण्यात आली आहे. सुनील पाटील यांची तडकाफडकी बदली झाल्याने त्यांना सतीश प्रकरणाची झळ लागल्याची चर्चा सुरू आहे.