। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
ज्वालाग्राही वायू आणि पदार्थांची वाहतूक करणार्या अवजड वाहनांवर असणारे चालक आणि त्याचा सहाय्यक हे आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण घेतलेले असावे अशी मागणी रायगड जिल्ह्यातील आपत्ती व्यवस्थापन तज्ज्ञ जयपाल पाटील यांनी केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली होती. या मागणीचे गांभीर्य लक्षात घेऊन देशातील उपप्रादेशिक परिवहन आयुक्तांना ज्वालाग्राही वायू आणि पदार्थ वाहतूक करणार्या वाहनांवर चालकासोबत त्याचा सहायक असण्याबरोबर या दोन्ही कर्मचार्यांनी आपत्ती व्यवस्थापनाचे प्रशिक्षण घेतलेले असावे असे निर्देश दिले आहे
याबाबत सविस्तर वृत्त असे की, अलिबागहून पनवेलकडे जाणारा सिलेंडरने भरलेला ट्रकला अचानक सायलेंसरमुळे चासी पेटू लागली. त्यावेळी त्यामार्गावरुन जाणारे आपत्ती व्यवस्थापनाचे तज्ञ मार्गदर्शक जयपाल पाटील व त्यांचे सहकारी विकास रणपिसे यांनी क्षणाचाही विलंब न करता ट्रक चालकाला कल्पना देवून ट्रकमधील अग्निशामक सिलेंडर चालवून आग विझविली व संभाव्य जिवीतहानी टाळली. ट्रक चालकाला गॅस सिलेंडर व आपत्तीचे ज्ञान असावे व चालकासोबत एक सहाय्यक कायम राहावा यासाठी केंद्रीय रस्ते मंत्री ना. नितीन गडकरी यांना जयपाल पाटील यांनी विनंतीपत्र पाठविले होते. त्यानुसार या मागणीला सिलेंडर वाहतुकीबाबत सुरक्षा संदर्भातील शिक्षण देण्याची मागणी मान्यता मिळाली.