। उरण । वार्ताहर ।
भारतीय कामगार संघटनेच्या वाहतूक विभागातर्फे उरण तालुक्यातील वाहतूक संघटनेच्या उरण विधानसभा अध्यक्ष करण चंद्रहार पाटील यांनी नियुक्त्या जाहीर केल्या आहे. यावेळी नवनिर्वाचित पदाधिकार्यांना शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचे रायगड जिल्हाप्रमुख व माजी आमदार मनोहर भोईर यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले. यामध्ये उरण विधानसभा उपाध्यक्षपदी सौरभ पाटील, जासई विभाग अध्यक्षपदी अतुल मढवी व नवघर विभाग अध्यक्षपदी संतोष पाटील यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या. यावेळी मनोहर भोईर यांनी त्यांना पुष्पगुच्छ देऊन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या व वाहतूक संघटनेबरोबर शिवसेना पक्षाचा कार्य पण आपल्या हातून घडावे अशी अपेक्षा व्यक्त केली.







