| माथेरान | वार्ताहर |
गेल्या वर्षी 20 ई-रिक्षाच्या सहा महिन्यांच्या पायलट प्रोजेक्टला सुरुवात झाली होती. टप्प्याटप्प्याने रिक्षाची संख्या वाढेल ही अपेक्षा होती. मात्र, सुप्रीम कोर्टात प्रत्येक तारखेला वेगवेगळे आक्षेप विरोधी पक्ष घेत होता. त्यामुळे अद्यापही वीसच गाड्या धावत आहेत माथेरानच्या खराब रस्त्यांचा फटका ई-रिक्षाला बसला आहे. आठ रिक्षा नादुरुस्त असल्याने रिक्षासाठी तासनतास रांगेत उभे राहावे लागते. तसेच रुग्णांना हॉस्पिटलमध्ये जाण्यासाठी देखील रिक्षा तात्काळ उपलब्ध होत नाहीत. रस्ते दुरुस्तीच्या कामात राजकीय दबावामुळे विलंब होत आहे की काय? असा प्रश्न नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे.
विद्यमान सनियंत्रण समितीची मुदत संपून दोन वर्ष झाली असल्याने नवीन समितीचे गठन करण्याची मागणी प्रवीण सकपाळ यांनी मंत्री आशिष शेलार यांच्याकडे केली आहे त्यानुसार शेलार यांनी पर्यावरण सचिव यांना नवीन सनियंत्रण समिती गठीत करण्याचे सांगितलं आहे या समितीमध्ये स्थानिकांचा समावेश असावा अशी देखील मागणी सकपाळ यांनी केली आहे.
सुनील शिंदे,
सचिव रिक्षा संघटना







