मुंबई – पुणे द्रुतगती मार्गावरुन प्रवास करताय…मग नक्की वाचा

| पुणे | प्रतिनिधी |
पुणे – मुंबई द्रुतगती मार्गावर गुरुवारी (दि. 2) पुन्हा ब्लॉक घेतला जाणार आहे. दुपारी 12 ते 2 दरम्यान दोन तासांचा हा ब्लॉक घेतला जाणार आहे. या दरम्यान, पुण्याकडे येणारी वाहतूक बंद ठेवण्यात येईल. आयटीएमएस अंतर्गत ओव्हरहेड गॅन्ट्री बसवण्यासाठी हा ब्लॉक घेतला जाणार आहे. यावेळी सोमटणे फाट्याजवळ ही गॅन्ट्री बसविण्यात येणार आहे.

गेल्या काही दिवसांपासून असे ब्लॉक घेतले जात आहे. तसेच पुढील काही महिने असेच ब्लॉक घेतले जाणार आहेत. ब्लॉकवेळी सर्व वाहतूक ही पर्यायी मार्गाने वळविण्यात येणार आहे. या दरम्यान ब्लॉक दरम्यान प्रवाशांनी सहकार्य करावे, असं आवाहन एमएसआरडीसी आणि महामार्ग पोलिसांनी केलेलं आहे.

गेल्या महिन्याभरात अनेकदा गॅन्ट्री बसवण्यासाठी ब्लॉक घेतला जात आहे. मुंबई – पुण्याला जोडणारा एक्स्प्रेस महामार्ग हा महत्वाचा आहे. या मार्गावरून लाखोच्या संख्येने अनेक नागरिक प्रवास करतात. या रस्त्यावरून दिवसभरात लाखो वाहने ये -जा करत असतात. उद्या दोन तासांचा विशेष ब्लॉक घेण्यात येणार असून प्रवासी नागरिकांनी याची नोंद घ्यावी तसेच नागरिकांनी या वेळेत प्रवास करणे टाळावे, असंही आवाहन करण्यात आले आहे.

मार्गात बदल
मुंबई ते पुणे (मुंबईहून पुणेकडे जाणारी वाहने) वाहिनीवर कि.मी. 54.400 वरून एन. एच. 4 जुना मुंबई-पुणे महामार्गावरून वाहतूक वळविण्यात येतील.

मुंबई ते पुणे (मुंबईहून पुणेकडे जाणारी वाहने) हलकी वाहने उर्से टोलनाक्यावरून तळेगाव चाकण लेन ने उसे खिंड वडगाव फाटा चौक मार्गे एन. एच. 4 जुना मुंबई-पुणे महामार्ग या रस्त्याने पुढे पुणेच्या दिशेला मार्गस्थ करण्यात येतील.

Exit mobile version