। आंबेत । वार्ताहर ।
रायगड जिल्ह्यात सद्या पाऊस अतिमुसळधार आहे असून म्हसळा तालुक्यातील आमशेत गावी वृक्षारोपण सोहळा अतिशय उत्साहात आणि आनंदात गावकर्यांनी पार पाडला. ‘एक झाड माझ्या आईसाठी’ या संकल्पनेनुसार ही वृक्षलागवड करण्यात आली. या लागवडीसाठी मुंबईकर मंडळींचा सुद्धा हातभार लागला होता. सर्व मुंबईकर त्याचप्रमाणे मुंबई कमिटी, ग्रामिण कमिटी व इतर सर्व सदस्यांनी यात सहभाग घेतला होता. आमशेत हे म्हसळा तालुक्यांतील अतिदुर्गम भाागातील गाव आणि दरड प्रवण क्षेत्रातील गाव असून येथील गावकर्यांनी जमिनीची होणारी धूप कमी करण्यासाठी हा अनोखा उपक्रम हाती घेत मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करून समाजात एक वेगळा संदेश दिला आहे.