| पाली/गोमाशी | वार्ताहर |
रा.जि.प शाळा सिद्धेश्वर तालुका सुधागड येथे 8 जुलै रोजी प्रधानमंत्री पोषणशक्ती योजने अंतर्गत परसबाग निर्मिती करिता मुख्याध्यापिका खामकर यांच्या मार्गदर्शनाखाली व निसर्गप्रेमी शिक्षक जनार्दन भिलारे यांच्या संकल्पनेतून 10 हापूस, केशर, मल्लिका या प्रजातींची आंबा कलमे लागवड करण्यात आली.
सदरची 10 कलमे जनार्दन भिलारे यांनी स्वतः तयार करून दोन वर्षे वयाची रोपे शाळेस परसबाग निर्मिती करिता भेट दिली. या वृक्षारोपण कार्यक्रमासाठी शाळा वर्धापन दिन समिती अध्यक्ष अविनाश कोनकर, गुणेश दामले, रेश्मा सुरावकर, योगेश सुरावकर, संतोष यादव, सचिन मुंढे, रोहिणी खामकर, जनार्दन भिलारे, स्वप्नाली मेमाणे, सुप्रिया पोंगडे, सावंत, यामिनी शिर्के आदी विद्यार्थी उपस्थित होते. सदर झाडे जगविण्याची जबाबदारी इको क्लब विद्यार्थी प्रमुख सुयश वाघमारे व सदस्य आणि शिक्षक जनार्दन भिलारे यांनी घेतली.