| अलिबाग | वार्ताहर |
अलिबाग तालुक्यातील गोंधळपाडा येथील रायगड जिल्हा परिषद शाळेत शनिवारी (दि.28) ‘एक पेड माँ के नाम’ या उपक्रमांतर्गत वृक्षारोपण कार्यक्रम साजरा करण्यात आला. हा कार्यक्रम साजरा होत असताना रायगड जिल्हा परिषद प्राथमिक उपशिक्षण अधिकारी सुनील भोपळे हे उपस्थित होते. त्यांच्या हस्ते रोप लावून कार्यक्रमाला सुरूवात करण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांच्या माता देखील उपस्थित होत्या. भोपाळे यांनी उपस्थितांना अनमोल असे मार्गदर्शन केले. त्यानंतर विद्यार्थ्यांनी आपल्या आईसह प्रत्येकी एक झाड लावले. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी कविता गायकवाड यांनी विशेष मेहनत घेतली. तर, मुख्याध्यापक रश्मी राऊत यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले.