102 बटालियनतर्फे रोप लागवड

xr:d:DAFT9h13XAo:3,j:12896316,t:22120606

| पनवेल | प्रतिनिधी |

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त खारघर येथील 102 बटालियन सीघ्र कृती दलातर्फे रोप लागवड करुन पर्यावरण संरक्षण आणि संवर्धनाबाबत जनजागृती करण्यात आली.

जागतिक पर्यावरण दिनी पर्यावरणपूरक जीवनशैली आणि हरित भविष्यासाठी बांधिलकी व्यक्त करत, यंदाच्या पर्यावरण दिनाच्या संकल्पनेनुसार प्रदूषण कमी करण्यावर, नैसर्गिक संसाधनांचे जतन करण्यावर आणि शाश्वत जीवनशैलीचा प्रसार करण्यावर 102 बटालियन सीघ्र कृती दलातर्फे विशेष भर देण्यात आला. यावेळी 102 बटालियन आरएएफ कमांडंट, अधिकारी आणि जवानांनी उत्साहाने वृक्षारोपण मोहिमेत सहभाग घेत अनेक वृक्षरोपांची लागवड केली.

जैवविविधतेचा न्हास आणि वाढते प्रदूषण या गंभीर पर्यावरणीय आव्हानात्मक समस्यांवर मात करण्यासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज आहे. प्लास्टिकचा वापर कमी करणे, पाणी आणि ऊर्जेची बचत करणे तसेच पर्यावरणपूरक सवयी अंगीकारणे, काळाची गरज आहे, असे मनोगत यावेळी कमांडर सुशांत कुमार प्रधान यांनी व्यक्त केले. यावेळी उपस्थित जवानांनी लागवड केलेल्या रोपांची काळजी घेण्याचा नियमित संकल्पही केला.

जागतिक पर्यावरण दिन पृथ्वीच्या संरक्षणासाठी प्रत्येक नागरिकाची जबाबदारी अधोरेखित करणारा दिवस असून, 102 बटालियन आरएएफतर्फे स्वच्छ, हिरवेगार आणि निरोगी पर्यावरण निर्मितीसाठी आपली कटिबद्धता पुन्हा एकदा व्यक्त करण्यात आली.

Exit mobile version