। उरण । वार्ताहर ।
पर्यावरणाचार्हास तसेच पृथ्वीचे वाढते तापमान आणी निसर्ग संवर्धन ही काळाची गरज ओळखून मोठ्या प्रमाणावर वृक्षलागवड करण्यात आली. या लागवडीत फणस, आंबा, जांबुळ, चिकू सारखी फळझाडे तर करंज, अर्जून, वड, पिंपळ सारखी जंगली झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले. या कार्यक्रमाला नंदाई प्रतिष्ठान वशेणीचे अध्यक्ष डॉ. हिराचंद पाटील आणि स्वर्गीय लक्ष्मण धर्मा म्हात्रे यांच्या आठवणी स्मृतिप्रीत्यर्थ, कामेश्वर म्हात्रे व सदाबहार दोस्ती गृप प्रतिष्ठानचे सदस्य यांनी ही झाडे उपलब्ध करून दिली आहेत.
यावेळी नागेंद्र म्हात्रे, हिराचंद पाटील, विनायक गावंड, गणेश भोईर, संतोष जोशी, विजय गावंड, सचिन पाटील, अरूण म्हात्रे, जितेंद्र म्हात्रे, कामेशवर म्हात्रे, कैलास पाटील, तुकाराम गावंड, हरिश्चंद्र म्हात्रे आदि उपस्थित होते.