। खांब-रोहे । वार्ताहर ।
गेल्या पाच वर्षांपासून आंबेवाडी-कोलाड विभागात चालू करण्यात आलेल्या बबली फिटनेस जीम यांच्याकडून संभे गावच्या परिसरात सुमारे 100 रोपांची लागवड करून वृक्षारोपण करण्यात आले.
बबली फिटनेस जीमचे बबली सानप आणि हरेश सानप व त्यांचा मित्र परिवार यांच्या संकल्पनेतून सदरचे वृक्षारोपण करण्यात आले. या वृक्षारोपण कार्यक्रम अंतर्गत त्यांनी आपल्या संभे गावाच्या परिसरात विविध जातीच्या रोपांची लागवड करून वृक्षारोपणाचा कार्यक्रम यशस्वीपणे संपन्न केला. बबली सानप व हरेश सानप तसेच त्यांच्या मित्र परिवारांनी सामाजिक बांधिलकी जपत आपल्या संभे गावाच्या परिसरात 100 रोपांची लागवड केल्याने पर्यावरण संवर्धन कार्यात थोडेफार सहकार्य केल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होताना दिसत आहे.