। नेरळ । वार्ताहर ।
कर्जत तालुक्यातील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आषाणे शाखेच्या माध्यमातून यावर्षीदेखील वृक्षारोपण करण्यात आले. आषाणे गावाच्या टेकडीवर गेली काही वर्षे मनसेच्या शाखेच्या वतीने वृक्षारोपण करण्यात येते.
आषाणे येथील टेकडीवर महराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने दरवर्षी पावसाळ्यात वृक्षारोपण केले जाते. त्यात आंबा, चिंबाड, जांभुळ, आगाशी, भेंडी अशा प्रकारची 30 झाडे लावण्यात आली.त्यावेळी मनसेच्या कार्यकर्त्यांनी स्वतः खड्डे खोदून झाडे लावण्याचे काम केले आहे. मागील काही वर्षे लावलेल्या झाडांचे संवर्धनदेखील मनसेचे कार्यकर्ते सतत करीत असतात.
यावेळी मनसेचे उमरोली पंचायत समितीचे उपाध्यक्ष मनोज ठाणगे, तसेच पंकज बुंधाटे, तुषार ठाणगे, अजित श्रीखंडे, कृष्णा श्रीखंडे, राकेश ठाणगे, रोशन जाधव, प्रशांत ठाणगे, रोशन श्रीखंडे, केतन श्रीखंडे आणि दिलीप जांभुळकर उपस्थित होते.
मनसेच्या आषाणे शाखेच्या वतीने वृक्षारोपण
