। वेणगाव । वार्ताहर ।
सतत पडत असणार्या वादळी वार्यासह मुसळधार पावसात कर्जत तालुक्यातील मोठे मोठे वेणगाव येथे 25 व 26 जुलैच्या रात्री दोन झाडे कोसळली. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.
येथील विनय पेठे यांचे नारळाचे झाड बाजूला शेजारी असणारे पंकज गोरे यांच्या घरावरती 26 जुलैच्या रात्री पावसामध्ये कोसळले. या घटनेत पंकज गोरे यांच्या घराचे थोडेफार प्रमाणात नुकसान झाले असून कोणतीही प्रकारची हानी झालेली नाही. तसेच वेणगाव येथीलच राम गवळे यांच्या घराशेजारी असणारा परसातील एक भले मोठे सागाचे झाड 25 जुलैच्या मध्यरात्री वादळी वार्याच्या पावसात पडले, दुर्दैवाने घराच्या विरुध्द दिशेला पडल्याने कोणतीही जीवित हानी झाली नाही.