मोहिमेस सुरुवात
। उरण । वार्ताहर ।
आचार्य विनोबा भावे आदिवासी वाडी, गागोदे ता पेण येथे कातकरी आदिवासी लोकांचे जातीचे दाखले काढण्याची मोहीम मान उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प पेण यांच्या संयुक्त विद्यमाने आणि उरण सामाजिक संस्थेच्या माध्यमातून सुरू झाली.
सदर मोहीम आचार्य विनोबा भावे आदिवासी वाडी येथून सुरू झाली असून पुढील एक महिन्यात सर्व वाड्यांवर कॅम्प घेतला जाईल आणि सर्व आदिवासी बांधवांना जातीचे दाखले काढून देण्यात येतील. आचार्य विनोबा भावे आदिवासी वाडीवरील कॅम्पमध्ये मंडळ अधिकारी मोकल, आदिवासी विकास निरीक्षक श्रजगदीश भानुशाली, तलाठी स्वप्नगांधा पाटील, आदिवासी विकास सहाय्यक चव्हाण, शिक्षक विष्णू म्हात्रे, जागृती पोवळे आदी मान्यवर उपस्थित होते. सदर कॅम्पचे आयोजन नितीन जेधे यांनी केले होते. उरण सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सुधाकर पाटील, सरचिटणीस संतोष पवार यांच्या मार्गदर्शनाखाली उपाध्यक्ष प्रा.राजेंद्र मढवी, सामाजिक कार्यकर्ते नामदेव ठाकूर आणि रायगड भूषण दत्ता गोंधळी यांनी सदर कॅम्पचे योग्य असे नियोजन केले.