धक्कादायक! चिरनेरमधील आदिवासी मुलीवर बलात्कार

। चिरनेर । वार्ताहर ।
आदिवासी वाडीवरील एका मुलीवर बलात्कार झाल्याची घटना ऐन गणेश उत्सवाच्या काळात घडली आहे याप्रकरणी उरण पोलीसांनी एका आदिवासी तरुणाला ताब्यात घेतले आहे. रघुनाथ विनायक कातकरी वय (27) असे या तरुणाचे नाव आहे या तरुणाने या आदिवासी मुलीला फसवून आपल्या दुचाकीवर बसवून वेश्वी येथील वाडीवर नेले त्यानंतर या तरुणांनी दारू पिऊन या मुलीवर अत्याचार केला झालेला प्रकार तिने आपल्या कुटुंबीयांना सांगितल्यानंतर त्यांनी याबाबत उरण पोलीस ठाण्यात तक्रार केली.

या तरुणाने काही महिन्यांपूर्वी देखील या मुलीसोबत असा प्रकार केल्याचे समोर आले आहे. ही मुलगी अल्पवयीन असल्याचे समजते. मात्र याबाबत अधिक माहिती घेवून पोक्सो अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात येणार आहे. सध्यास्थितीत रघुनाथ कातकरी याच्यावर बलात्काराचा गुन्हा उरण पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.

Exit mobile version