रानभाज्यांवर आदिवासींचा उदरनिर्वाह

भाजीच्या एका जुडीला मिळतोय दहा रुपयांचा भाव
। माथेरान । वार्ताहर ।
माथेरानमधील आदिवासी महिला डोंगरदर्‍यांमध्ये मिळणार्‍या कुरडू, शेवला, कुडा, आकुर अशा विविध रानभाज्यांवर आपला उदरनिर्वाह करताना दिसून येत आहेत. या महिला आपले कुटुंब चालविण्यासाठी दिवस दिवस जंगलात भटकंती करुन विविध प्रकारच्या रानभाज्या शोधून अर्थार्जन करीत असतात. या भाज्यांमध्ये अनेक औषधी गुणधर्म असतात, त्यामुळे ग्राहकही त्या आवर्जून खरेदी करताना दिसत आहेत.
पावसाळा सुरू झाला की या रानभाज्या उगविण्यास सुरवात होते. या रानभाज्या खायला खूप चविष्ट व पौष्टिक असतात. जसजसा पाऊस वाढत जाईल, तस तशा अनेक भाज्या तयार होत असतात. या आदिवासी महिला रानावनात फिरून या भाज्या मिळवतात. याच रानभाज्या विकून त्यांना आर्थिक उत्पन्नाचे साधन उपलब्ध होत आहे. या भाज्यांची आवक वाढल्यामुळे त्यांचे दर स्थिर आहेत. एक जुडी आत्ता सध्या दहा रुपयांना मिळत आहे. या सेंद्रिय रानभाज्या आदिवासी महिलांकडून खरेदी करण्यासाठी माथेरानवासियांची गर्दी पहावयास मिळत आहे.

माथेरानमध्ये दर रविवारी आठवडा बाजार असतो. यावेळी आसपासच्या आदिवासी महिला या सेंद्रिय रान भाज्या विक्रीसाठी आणतात. या भाज्या खूप चवदार असतात.पावसाळ्या एकदा तरी त्या खाव्यात. कारण, या रानभाज्या गुणकारी व औषधी असतात.

सुषमा पार्टे, गृहिणी
Exit mobile version