| कर्जत | वार्ताहर |
धनगर समाजाला आदिवासी समाजाच्या आरक्षणात समाविष्ठ करण्यासाठी धनगर समाजाकडून मोठया प्रमाणात मोर्चे-आंदोलन केली जात आहेत. अशात धनगर समाजाला आदिवासी आरक्षण देऊ नये, अशी मागणी आदिवासी समाजाकडून केली जात आहे. या पार्श्वभूमीवर आदिवासी समाज आता आक्रमक झाला आहे.
कर्जत तालुक्यात सोमवार दि.9 रोजी आदिवासी आरक्षण बचाव समिती कर्जत-खालापूर यांच्यावतीने धडक मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. या मोर्चाची सुरुवात कर्जत शहरातील छत्रपत्ती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास वंदन करून झाली. पुढे छत्रपत्ती शिवाजी महाराज चौक, कर्जत मुख्य बाजार पेठ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास वंदन करत कर्जत पोलीस ठाणे येथून कर्जत उपविभागीय अधिकारी प्रांत कार्यालया येथे या मोर्चाने धडक दिली.
यावेळी आदिवासी संघटना कर्जत तालुकाध्यक्ष परशुराम दरवडा, राजिपचे माजी सभापती नारायण डामसे, दत्तात्रेय हिंदोळा, अश्विनी पारधी, जयवंती हिंदोळा, भरत शिद, बिरसा जयवंत शीद, अंनता वाघमारे, हिरा पवार, संतोष मेंगाळ, नीलम ढोले, गणेश पारधी, भगवान भगत, काशिनाथ पादीर, सुनिल पारधी, गणेश केवारी, इंदू केवारी, यासह आदिवासी ठाकूर, महादेव कोळी, कातकरी सामाजाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.