पुलवामा हल्ल्यातील शहीद जवानांना वाहिली श्रध्दाजंली

। पेण । वार्ताहर ।
14 फेब्रुवारी 2019 मध्ये जम्मु काश्मिर मधील पुलवामामध्ये देशाच्या जवानांनवर झालेल्या भ्याड हल्ल्यात जे जवान शहीद झाले त्यांना सह्याद्री प्रतिष्ठान पेण व गांधी वाचनालय पेण यांच्या संयुक्त विद्यमाने श्रध्दाजंलीच्या कार्यक्रमाचे आयोजन महात्मा गांधी वाचनालय पेण येथे करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी सेवानिवृत्त सैनिक सुरेंद्र ठाकुर हे उपस्थित होते. यावेळी समस्थ श्रध्दाजंलीच्या कार्यक्रमासाठी जमलेल्या पेणकरांनी एक मिनीट उभे राहून शहीदांना श्रध्दाजंली वाहिली. तर यावेळी सेवानिवृत्त सैनिक सुरेंद्र ठाकुर, नंदा म्हात्रे, सपना पाटील, अ‍ॅड. मंगेश नेने, रोशन टेमघरे, समिर म्हात्रे, संतोष पाटील यांनी शहीद जवानांना शब्द सुमनांनी श्रध्दाजंली वाहिली. या कार्यक्रमासाठी महात्मा गांधी वाचनालयाचे अध्यक्ष अरविंद वनगे आवर्जून उपस्थित होते.

Exit mobile version