अदिती सगर यांचा सत्कार

| अलिबाग | विशेष प्रतिनिधी |
वाईल्ड लाईफ वॉरियर्स ऑफ अलिबाग, या संस्थेची सक्रिय कार्यकर्ती अदिती सगर हिचा नुकताच अँटी करप्शन फाऊंडेशन ऑफ इंडिया संस्थेतर्फे वन्यजीव बचाव, उपचार तसेच ती वन्यप्राण्यांच्या सोबत सहजिवनासंदर्भात करत असलेल्या जनजागृतीच्या कार्याची दखल घेत जाहीर सत्कार करण्यात आला. यावेळी डॉ. प्रसाद दाभोळकर, पारस घरत, ओमकार कामतेकर ,धनंजय म्हात्रे, रुपेश दांडेकर, ोगेश घरत, श्रीकांत शिंदे, संदेश खोत, हर्षल कदम, मिलिंद मगर, नवनाथ वाघ – एक्झिक्युटिव्ह मेंबर्स तसेच इतर सहकारी उपस्थित होते

Exit mobile version