शेकापचा वर्धापन, नाना पाटील अण्णाभाऊ साठे जयंती संपन्न
केज | प्रतिनिधी |
केज येथे स्वर्गीय शेकापचे ज्येष्ठ नेते भाई गणपतराव देशमुख यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी शेतकरी कामगार पक्ष कार्यालयासमोर शोकसभा झाली. या वेळी जेष्ट नेते रंजितसिंह पाटील यांनी श्रद्धांजली वाहिली बोलताना भाई गणपतराव देशमुख एवढ्या उंचीचे व्यक्तिमत्व असताना देखील सामान्य जीवन जगले आकरा वेळा निवडुन येणे सोपं नाही पन ते करुन दाखवले देशासमोर वेगळा आदर्श ठेऊन गेले असे मत माजी सभापती राजेसाहेब देशमुख यांनी व्यक्त केलं,आजच्या आमदारांनी गणपतरावांचे गुण अंगी करण्याची गरज आहे तर अण्णाभाऊ साठे आणि क्रांतिसिंह नाना पाटलांचा कार्य कर्तुत्व सामान्यासाठी होत असे मत भोसले सर यांनी व्यक्त केले शिवसेनेचे रत्नाकर शिंदे यांनी श्रद्धांजली अर्पण केली उपस्थितांनी क्रांतिसिंह नाना पाटील अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला पुष्प हार घालुन अभिवादन केले, या शोकसभेला विविध क्षेत्रात काम करणारे मंडळी उपस्थीत होती.
आबांनी शेतकरी कामगारासाठी शेवटच्या श्वासापर्यंत काम केलं याचा आदर्श घेऊन आम्ही पक्षाचे कार्यकर्ते म्हणून शेकापचा झेंडा खांद्यावर घेऊन काम करत राहु आशा भावना भाई मोहन गुंड यांनी व्यक्त केल्या, क्रांतिसिंह नाना पाटील कॉम्रेड अण्णा भाऊ साठे भाई गणपतराव देशमुख यांच्या जीवन कार्यावर हनुमंत घाडगे यांनी भावना व्यक्त केल्या, बहुजन रयत परीषदेचे रमेश पाडुळे महिला समुपदेशक जनाबाई खाडे हनुमंत साने जी डी देशमुख पत्रकार दशरथ चौरे आनिल गलांडे महादेव काळे वैरागे बापु अॅड कोठावळे अमोल सावंत, अॅड सुदर्शन मुंढे, अॅड निखिल बचुटे, भागवत पवार, डिगाबर मगर, राणी बावणे, आशा चाटे यांनी श्रद्धांजली वाहिली कार्यक्रम यशस्वीतेसाठी भाई अशोक रोडे मंगेश देशमुख हनुमंत मोरे विशाल मुळे यांनी परिश्रम घेतले.