स्व. मिनाक्षी पाटील यांना अभिवादन

| अलिबाग | प्रतिनिधी |

प्रभाकर पाटील सार्वजनिक वाचनालयाच्या रामनारायण सभागृहात शनिवार (दि.13) माजी राज्यमंत्री तथा रायगड जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या माजी अध्यक्षा स्व.मिनाक्षी पाटील यांना त्यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. हा कार्यक्रमाचे आयोजन प्रभाकर पाटील सार्वजनिक वाचनालय आणि स्व. प्रभाकर पाटील सांस्कृतिक मंच यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आला होता. यावेळी स्व. मिनाक्षी पाटील यांच्या प्रतिमेला रायगड पत्रकार संघाचे उपाध्यक्ष तसेच ग्रंथमित्र पुरस्कार प्राप्त नागेश कुळकर्णी यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमादरम्यान स्व. मिनाक्षी पाटील यांच्या आठवणींना उजाळा देण्यात आला.

यावेळी ज्येष्ठ नाट्यकर्मी शरद कोरडे, माजी नगरसेवक आर.के. घरत, कोमसापचे जिल्हा प्रतिनिधी नंदू तळकर, विनोद टेंबुलकर, जिल्हा पोलीस पाटील संघटनेचे अध्यक्ष विकास पाटील, अलिबाग सार्वजनिक वाचनालयाचे कार्यवाह संतोष बोंद्रे, चारुशीला कोरडे, सार्वजनिक वाचनालयाच्या ग्रंथपाल ज्योती म्हात्रे, हेमकांत सोनार, झेबा कुरेशी आदी उपस्थित होते.

Exit mobile version