| चिरनेर | वार्ताहर |
शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा सालाबाद प्रमाणे शिवसेना, युवासेना शाखा चिरनेर व भोम यांच्या वतीने मंगळवारी (दि. 23) चिरनेर येथील श्रीराम मंदिराच्या सभामंडपात 97 व्या जयंतीनिमित्त श्रद्धांजली अर्पण केली. याप्रसंगी संतोष ठाकूर, गणेश म्हात्रे, सचिन घबाडी, समाधान ठाकूर, सदानंद पाटील, सचिन म्हात्रे, गजानन वशेणीकर, आशिर्वाद ठाकूर, प्रफुल्ल खारपाटील, अरुण ठाकूर, शशांक ठाकूर, दत्तात्रेय म्हात्रे, ज्योती म्हात्रे, पद्माकर मोकल, अशोक फोफेरकर, गजानन चौलकर, चांगदेव जोशी, हरीश फोफेरकर, श्रीधर पाटील, अरुण वशेणीकर, सुरेश म्हात्रे, मृणाली ठाकूर, निकिता नारंगीकर, समुद्रा म्हात्रे, नीलम चौलकर, तसेच अन्य पदाधिकारी मान्यवर, शिवसैनिक व ग्रामस्थ उपस्थित होते.







