लोकनेते दि. बा. पाटील यांना अभिवादन

xr:d:DAFT9h13XAo:3,j:12896316,t:22120606

| पनवेल | प्रतिनिधी |

सिडको प्रकल्पग्रस्तांना न्याय मिळवून देण्यासाठी साडेबारा टक्के योजनेचे प्रणेते, माजी खासदार, माजी विरोधी पक्ष नेते व लोकनेते दि. बा. पाटील यांच्या जन्म शताब्दीनिमित्त स्वाभिमानी रिपब्लिकन पार्टीचे रायगड जिल्हा अध्यक्ष व प्रकल्पग्रस्त रिक्षा चालक मालक संघटना टपाल नाका पनवेल यांच्यावतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. त्यावेळी त्या ठिकाणी नरेश परदेशी व दिलीप नाईक आणि प्रकल्पग्रस्त रिक्षा चालक-मालक संघटनेचे सर्व सभासद उपस्थित होते.

पनवेल विधानसभा मतदारसंघातून पाच वेळा आमदार, कुलाबा लोकसभा मतदार संघातून दोन वेळा खासदार, दोन वेळा महाराष्ट्र विधान सभेचे विरोधी पक्ष नेते, पनवेल नगरपालिकेचे नगराध्यक्ष, पनवेल कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती असा त्यांचा जवळजवळ साठ वर्षाचा राजकीय इतिहास आहे. त्यांची महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांचे कैवारी म्हणून ओळख आहे. सिडकोच्या प्रकल्पामध्ये येथील भूमिपुत्र ज्यावेळेस आपल्या सर्व जमिनीच्या हक्कांपासून वंचित झाला. त्यावेळी त्यांनी शेतकऱ्यांचे मोठे आंदोलन उभे केले व त्याचेच फळ म्हणून पनवेल नवी मुंबई परिसरातील जे शेतकरी सिडकोच्या प्रकल्पामुळे बाधित झाले होते त्यांना साडेबारा टक्केच्या रूपाने विकसित भूखंड मिळाले आणि याच विकसित भूखंडांमुळेच येथील शेतकऱ्यांची आर्थिक, सामाजिक व शैक्षणिक प्रगती झाली. याचे सर्व श्रेय हे या एकमेव दि. बा. या व्यक्तीला जात आहे. येथील सर्व प्रकल्पग्रस्तांनी पनवेल येथे तयार झालेले नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्यात यावे अशी जोरदार मागणी केलेली आहे.

Exit mobile version