| मुरूड- जंजिरा | प्रतिनिधी |
मुरूड शहरातील जुनी पेठ येथील समाजसेवक मोहन गजानन करंदेकर यांच्या निवासस्थानी क्रांतिवीर भगतसिंग राजगुरु व सुखदेव यांच्या 94 व्या स्मृतीदिनी शेकडो मान्यवरांच्या उपस्थितीत अभिवादन कार्यक्रम संपन्न झाला. उपस्थितांनी क्रांतिवीराना पुष्प वाहून आदरांजली देत स्मरण केले. शुर वीरांची जाज्वल्य राष्ट्र देशभक्ती व खरा इतिहास नवीन पिढीला ज्ञात व्हावा अशी मोहन करंदेकर यांची धारणा असून चित्र प्रदर्शनाद्वारे अशा शहिदांचे स्मरण व्हावे म्हणून ते गेली 43 वर्ष ते निर्जळी उपवास करतात. सेनानी क्रांतीकारकांचे भिंतीपत्रके ही करंदेकर यांनी प्रदर्शनीत ठेवली होती. युवा पिढीला क्रांती सूर्यांचे सतत स्मरण रहावे या धारणेतुनच हा शहीद दिन साजरा करीत असल्याचे करंदेकर यांनी सांगितले. याप्रसंगी पोलीस निरीक्षक परशुराम कांबळे. गिरीश साळी, स्नेहा पाटील, संदीप पाटील, बाळकृष्ण कासार, अजित कारभारी, नितीन अंबुर्ले, प्रा.मेघराज जाधव, वासंती उमरोटकर, पांडुरंग आरेकर, श्रीकांत खोत, स्वप्निल कवळे, ऋषी पोतदार, मानसी करंदेकर, राजेश गुप्ते, शालेय विद्यार्थी व असंख्य मान्यवर भेट देऊन वीर हुतात्म्यांना मानवंदना देण्यात आली.
शहीद दिनानिमित्त क्रांतिवीरांना अभिवादन
