चीनला जशास तसे उत्तर
नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
नवीन वर्षाच्या दिवशी गलवान खोर्यात चीनचा ध्वज फडकवल्याच्या दाव्याला भारतीय लष्कराच्या जवानांनी पूर्णविराम दिला. काही दिवसांपूर्वी चिनी सैनिकांनी या प्रदेशात त्यांचा ध्वज प्रदर्शित केल्याचा दावा करण्यात आला होता. मात्र आता त्याच ठिकाणी उभं राहून भारतीय जवानांनी तिथं तिरंगा फडकवला आहे. त्यामुळे आता चीनचे दावे फोल ठरले आहेत.
चीन सरकारने नवीन सीमा कायदा लागू करण्याच्या दोन दिवस अगोदर आपल्या नकाशात अरुणाचल प्रदेशातील 15 ठिकाणांचे नामांतर करण्याचा प्रयत्न केला होता. भारत सरकारने गेल्या गुरुवारी सांगितले की, चीनने अरुणाचल प्रदेशातील काही ठिकाणांची नावे स्वतःच्या भाषेत बदलण्याचा प्रयत्न केल्याच्या बातम्या पाहिल्या आहेत आणि असे ठामपणे सांगितले आहे की सीमावर्ती राज्य भारताचा अविभाज्य भाग आहे आणि नेहमीच राहील आणि नवी नावं दिल्यानं वस्तुस्थिती बदलत नाही.