। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त जेएसएम कॉलेजच्या माध्यमातून सुरु करण्यात आलेले तिरंगा अभियान यशस्वी करण्याचा निर्धार संस्थेचे अध्यक्ष अॅड. गौतम पाटील यांनी केला आहे.
या अभियानाच्या निमित्ताने महाविद्यालयातर्फे विद्यार्थी, शिक्षक, पालकसभेचे आयोजन करण्यात आले होते. दोन सत्रात झालेल्या या पालक सभेसाठी एकूण 300 पालक हजर होते. शैक्षणिक अभ्यासक्रम, सहशैक्षणिक उपक्रम, इतर उपक्रमांची माहिती यावेळी पालकांना देण्यात आली. महाविद्यालयातील सर्व विभागप्रमुख, शिक्षकांची पालकांशी ओळख करून देण्यात आली. महाविद्यालयात येणार्या प्रत्येक पालकास महाविद्यालयाची व पाल्याच्या प्रगतीची कल्पना असणे आवश्यक आहे, असल्याचे यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अनिल पाटील यांनी सांगितले. यावेळी उपप्राचार्य डॉ. एन. एन. शेरे, डॉ. सोनाली पाटील, प्रा. गौरी लोणकर, प्रा. जयश्री पाटील, प्रा.वर्षा पाटील, प्रा.एस. एल. हाके, प्रा.आर. एन.चिखले, अजय सावंत, बी.आर.गुरव, समृद्धी पाटील, प्राची रानडे व इतर शिक्षक उपस्थित होते.
प्रथम सत्रात प्रा.आशुतोष मेहंदळे यांनी सूत्रसंचालन केले तर विज्ञान शाखेचे प्रमुख प्रा. अशोक जाधव, प्रा. डॉ. मीनल पाटील, प्रा.डॉ. एस.ए. कानडे यांनी पालकांशी संवाद साधला. पालकांच्या वतीने राऊत, सुनीता कोळी, जीवन पाटील यांनी मत व्यक्त केले तर अदिती सिनकर हिने विद्यार्थ्यांच्या वतीने विचार मांडले. दुसर्या सत्रात अपर्णा देव यांनी सूत्रसंचालन केले तर वरिष्ठ शिक्षक डी.एन. गायकवाड, मिलिंद धोदरे यांनी पालकांशी संवाद साधला. हर घर तिरंगाफ उपक्रमाच्या अंतर्गत सर्व विद्यार्थी व पालकांनी घरोघरी, इमारतीवर ध्वज उभारावा, असे आवाहन यावेळी पालकांना करण्यात आले.
जेएसएम कॉलेजमध्ये प्रवेश घेऊन पाल्यासाठी आपण एका चांगल्या कॉलेजची निवड केली आहे. उच्च विद्याविभूषीत व अनुभवी प्राध्यापक तसेच आवश्यक ग्रंथालय, प्रयोगशाळा यासारख्या सुविधा महाविद्यालयाने उपलब्ध करून दिल्या असून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी अनेक उपक्रम राबविले जात आहेत.
– अॅड. गौतम पाटील, अध्यक्ष, जेएसएम महाविद्यालय
