| रेवदंडा | वार्ताहर |
2023-24 हे वर्ष हिंदवी स्वराज्याचे 350 वे वर्ष असून त्यानिमित्य महाराष्ट्रातील गिर्यारोहण क्षेत्रातील शिखर संस्था असलेल्या अखिल महाराष्ट्र गिर्यारोहण महासंघाच्या वतीने महाराष्ट्रातील विविध 350 किल्ल्यांवर भारतीय तिरंगा व स्वराज्याची भगवी पताका अर्थात भगवा ध्वज फडकवण्याचा तसेच शिवप्रतिमा पूजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे. महासंघाचे अध्यक्ष उमेश झिरपे, कार्यकारी अध्यक्ष ऋषीकेश यादव व राहुल वारंगे हा अभिनव उपक्रम शिवप्रेमींसाठी घेतला आहे. महासंघाद्वारे संपूर्ण महाराष्ट्र सह जगात महाराजांचे स्वराज्य साक्ष देणारे गडकिल्ले व साहसाची सांगड घालून दऱ्याखोऱ्यातील वैभव निसर्गाचे सौंदर्य या सर्वांना एका धाग्यात गुंफणारा हा उपक्रम असल्याची माहिती या संघातील रेवदंडा भागात राहणारे सदस्य किशोर वडेर यांनी कृषीवलजवळ बोलताना दिली. या परिसरातील मुरुड तालुक्यातील कोर्लई, अलिबाग तालुक्यातील रेवदंडा आगरकोट येथे हा उपक्रम प्रजासत्ताक दिवशी राबविण्यात येणार आहे.