कनिष्ठ महाविद्यालय तळाच्यावतीने तिरंगा रॅली

| तळा | वार्ताहर |

कला वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय तळाच्यावतीने घरोघरी तिरंगा उपक्रमाअंतर्गत तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. जनतेच्या मनात स्वातंत्र्य लढ्याच्या स्मृती जागृत रहाव्यात, स्वातंत्र्य संग्रामातील अज्ञात नायक, क्रांतिकारक, स्वातंत्र्य संग्रामात घडलेल्या विविध घटनांचे स्मरण व्हावे, तसेच स्वातंत्र्यासाठी चेतवलेले स्फुल्लिंग कायम तेवत रहावे व देशभक्तीची जाज्वल्य भावना कायमस्वरूपी जनमानसात रहावी, या उद्देशाने या दैदिप्यमान इतिहासाचे अभिमानपूर्वक संस्मरण करण्यासाठी 9 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट या कालावधीत घरोघरी तिरंगा हा उपक्रम राबविण्यात येत असून कला वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय तळाच्या वतीने कनिष्ठ महाविद्यालयापासून मुळे नाका, नगरपंचायत, बाजारपेठ ते परत कनिष्ठ महाविद्यालय अशी रॅली काढण्यात आली.

या रॅली दरम्यान विद्यार्थ्यानी देशभक्तीपर घोषणा दिल्या. रॅलीनंतर महाविद्यालयाच्या प्रांगणात प्राध्यापक पाटील एन.सी. यांनी विद्यार्थ्याना शपथ दिली.घरोघरी तिरंगा अभियानांतर्गत तिरंगा यात्रा, तिरंगा रॅली, तिरंगा मॅरेथॉन, तिरंगा सांस्कृतिक कार्यक्रम, तिरंगा कॅनव्हॉस, तिरंगा प्रतिज्ञा, तिरंगा सेल्फीज, तिरंगा ट्रिब्युट, तिरंगा मेळा आदी उपक्रम राबविण्यात येणार आहेत.

Exit mobile version