दिव्यांग विद्यार्थ्याला ट्रायसिकलची मदत

| नेरळ | प्रतिनिधी |

कर्जत तालुक्यात सार्वजनिक आणि आदिवासी भागात काम करणारे नवी मुंबई येथील श्री साई ट्रस्ट यांच्या माध्यमातून तालुक्यातील कशेळे येथील दिव्यांग विद्यार्थ्याला ट्रायसिकलची मदत देण्यात आली.

कशेळे येथील ज्ञानानुभव विद्यालयकडून मुख्याध्यापक मिल्के यांनी तेथील दिव्यांग विद्यार्थी कल्पेश दळवी यास चालत येत नसल्याने आणि त्या विद्यार्थ्यास शिकण्याची जिद्द लक्षात घेऊन काही मदत मिळेल काय? अशी सूचना मिल्के यांनी तालुक्यातील माणगाव येथील जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक दिलीप घुले यांना केली होती. त्यानुसार दिलीप घुले यांनी नवी मुंबई श्री साई ट्रस्ट कडे त्या दिव्यांग विद्यार्थ्यांची माहिती दिली. यावर श्री साई ट्रस्ट कडून तात्काळ कार्यवाही करण्यात आली असून कशेळे येथील ज्ञानानुभव माध्यमिक विद्यालय मध्ये दहावी मध्ये शिकणार्‍या कु.कल्पेश दळवी या दिव्यांग विद्यार्थ्यास ट्रायसिकल भेट देण्यात आली. श्री साई ट्रस्टचे संचालिका राधिका घुले यांचे हस्ते देण्यात आली. त्यावेळी ज्ञानानुभव विद्यालयाचे मुख्याध्यापक मिल्के तसेच विद्यार्थ्यांचे पालक आणि शिक्षक जोशी, विकास कांबळे, तायडे आणि माणगाव शाळेचे मुख्याध्यापक दिलीप घुले उपस्थित होते.

Exit mobile version