जेल नाका येथे तिहेरी अपघात

| रत्नागिरी | प्रतिनिधी |

रत्नागिरी शहरातील जेल नाका या वर्दळीच्या ठिकाणी शनिवारी (दि.29) सकाळी तीन वाहनांचा तिहेरी अपघात झाला. या तिहेरी अपघातात एक पिकअप व्हॅन, कंटेनर आणि एक चारचाकी वाहनाचा समावेश आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अपघाताचा जोर मोठा असल्याने तिन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. या अपघातामध्ये सुदैवाने कोणतीही जीवितहानी किंवा गंभीर दुखापत झालेली नाही. मात्र, अपघातामुळे जेल नाका परिसरातील मुख्य मार्गावर वाहनांच्या रांगा लागल्याने वाहतुकीवर परिणाम झाला होता.

Exit mobile version