डोलवीमध्ये ट्रक आणि टँकरचा अपघात

अलिबाग । शहर प्रतिनिधी ।
पेण तालुक्यातील डोलवी येथे झालेल्या ट्रक आणि टँकर यांच्यात झालेल्या अपघातात ट्रक चालक जखमी झाला आहे. या बाबतचे वृत्त असे की, पेण तालुक्यातील डोलवी येथे सोमवारी मध्य रात्री 2ते 3 वाजण्याच्या सुमारास मुंबई-गोवा महामार्गावरुन परस्पर विरोधी रस्त्याने जाणार्या ट्रक आणि टँकरसध्ये अपघात झाला. या अपघातात ट्रक चालक जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरु आहेत. ट्रक चालकाचे नाव घनश्याम जानू केवत असे आहे. या बाबतची नोंद वडखळ पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.

Exit mobile version