ट्रक बोलेरोवर उलटून अपघात

गाडीसह चालकाचा चेंदामेंदा

| रामपूर | वृत्तसंस्था |

उत्तर प्रदेशातून एक ह्दयद्रावक अपघाताची घटना समोर आली आहे. लाकडाचा भुसा भरलेला ट्रक बोलेरो गाडीवर उलटल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात बोलेरोचा चुराडा झाला असून चालकाचा जागीच मृत्यू झाला. त्याच्या डोक्याचा चेंदामेंदा झाला होता. तर, शरीर पूर्ण दबले होते. दिल्ली नैनिताल महामार्गावरील रामपूर येथील पहाडी गेट चौकात ही घटना घडली.

या अपघाताची व्हिडीयो शोशल मिडीयावर प्रचंड व्हायरल होत आहे. त्यात, बोलेरो चालक मागून ट्रक येत असताना अचानक गाडी वळवतो. त्यामुळे ट्रकचालक त्याला वाचवण्याचा प्रयत्न करतो. मात्र, त्या प्रयत्नात ट्रकचे चाक डिव्हायडरवर गेल्याने ट्रक बोलेरो गाडीवर उलटला. या अपघातानंतर ट्रकमधील भुसा रस्त्यावर पसरला. त्यामुळे बोलेरो चालकाला बाहेर पडण्याचीही संधी मिळाली नाही. घटनास्थळी अपघातानंतर मोठी गर्दी झाली होती. या अपघातानंतर पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत तातडीने चार क्रेन आणि 2 बुलडोजरच्या मदतीने बचावकार्य राबविले. बराच वेळ प्रयत्नानंतर दोन्ही वाहने बाजूला करण्यात आली. त्यानंतर ट्रक उभा करून रस्त्याच्या बाजूला नेण्यात आला. परंतु, बोलेरोचा चुराडा झाला होता. त्यानंरत गाडीमध्ये चालकाचा अडकलेला मृतदेह बाहेर काढण्यासाठी गाडीचा दरवाजा कटरने कापण्यात आला.

Exit mobile version