ट्रक – रिक्षा यांची धडक ; पाच जण ठार

नाशिक | प्रतिनिधी |
नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील लासलगाव – विंचूर रस्त्यावर शनिवारी सायंकाळी वाळू वाहतूक करणारा ट्रक आणि पेरिक्षा यांची धडक होऊन, पाच जण ठार झाले. मृतांमध्ये लोणी प्रवरा (अहमदनगर) येथील दोघांचा समावेश आहे. सायंकाळी पेरिक्षा प्रवाशांना घेऊन निघाली होती. यावेळी समोरून आलेल्या ट्रकशी तिची धडक झाली. या अपघातात सुहास निकाळे (40, रिक्षाचालक, विंचूर), विठ्ठल भापकर (65) आणि भाऊसाहेब नागरे (60, दोघेही लोणी-प्रवरा), किसन बैरागी (60, धारणगाव खडक), रतन गांगुर्डे (40, इंदिरानगर, विंचूर) यांचा मृत्यू झाला.

Exit mobile version