ट्रकचोरांच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या

| पनवेल | वार्ताहर |

पनवेल शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने एका सराईत चोरट्यास अटक केली असून, त्याच्याकडून राबोडी, डोंबिवली, खांदेश्वर, कळंबोली, रबाळे, अंटोप हील या पोलीस ठाण्यांमध्ये दाखल गुन्ह्यांमधील लाखो रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

पनवेल शहर पोलीस ठाणे हद्दीत गुन्हे प्रकटीकरण पथकास मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, रात्र गस्ती करत असताना सपोनि प्रकाश पवार आणि पथक पनवेल-जेएनपीटी रोडवर गस्त घालीत असताना त्यांना सराईत गुन्हेगार अब्दुल रकीब लाल मोहम्मद खान (25, रा. रबाळे) हा त्याच्या ताब्यामध्ये असलेल्या टाटा कंपनीचा ट्रक क्रमांक (एमएच 04 एच 1007) सह संशयास्पदरित्या मिळून आला. त्याच्याकडे ट्रकबाबत विचारणा केली असता त्याने काहीही संयुक्तिक उत्तर न दिल्याने नमूद ट्रक हा चोरीचा असल्याचा संशय आल्याने त्याला ताब्यात घेण्यात आले. चौकशीअंती ठाणे येथून ट्रक चोरी केला असल्याचे निष्पन्न झाले आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे, पोलीस निरीक्षक गुन्हे अंजुम बागवान, पोलीस निरीक्षक प्रशासन प्रवीण भगत यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकातील सपोनी प्रकाश पवार, पोउपनी अभयसिंह शिंदे, पोउपनी विनोद लबडे, पोलीस हवालदार नितीन वाघमारे, पोलीस हवालदार परेश म्हात्रे, पोलीस हवालदार अविनाश गंथडे, पोलीस हवालदार अमोल पाटील, पोना अशोक राठोड, पोना मिथुन भोसले, पोना रवींद्र पारधी, पोना विनोद देशमुख, पोना लक्ष्मण जगताप, पोशि विशाल दुधे, पोशि नितीन कांबळे, पोशि साईनाथ मोकल, पोशि किरण कराड, पो.शि. प्रसाद घरत यांनी तांत्रिक तपास केला असता त्याच्याकडून राबोडी, डोंबिवली, खांदेश्वर, अंटोप हील, कळंबोली, रबाळे या पोलीस ठाण्यांमध्ये दाखल असलेले 7 गुन्हे उघडकीस आणले. त्यामध्ये 2 लाख रु किमतीचा टाटा ट्रक क्र. एमएच 04 एच 1007, 20,000/- रु किमतीची पल्सर मोटारसायकल क्र. एमएच 05 बीएल 7115), 40,000/- रु किमतीची पल्सर मो.सा. क्र. एमएच 05 डीजे 1377, 15,000/- रु किमतीची होंडा डीओ मो.सा. क्र. एमएच 46 सीबी 1482, 20,000/- रु किमतीची पॅशन प्रो मो. सा. क्र. एमएच 01 एयू 7525,20,000/- रु किमतीची होंडा डिलक्स मो.सा. क्र. एमएच 14 बीएन 2401, असा लाखो रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. दरम्यान, या आरोपीस खांदेश्वर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्हात अटक करण्यात आली आहे.

Exit mobile version